Beed Politics Saam tv
महाराष्ट्र

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

pankaja munde vs manoj jarange patil : लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा परीणाम बीडमध्ये पहायला मिळाला होता. पंकजा मुंडेचा पराभव झाला होता. बीडमध्ये भाजपला उतरती कळा लागली आहे. कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनी राजीनामा देऊन जरांगेंची भेट घेतली आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

बीड : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबतची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण वाऱ्यासारखं बदलताना दिसत आहे. जरांगे यांच्या भेटीसाठी अनेक पक्षातील लोकांच्या रांगा लागल्या आहेत. काही भर दिवसा भेटत आहेत तर काही मध्यरात्री येऊन खळबतं करत आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घेतली. म्हस्के हे गेली सहा वर्ष बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय. गेल्या वर्षी मस्केंनी आयोजित बैलगाडा शर्यतीवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी ‘बाकी सगळे फुस्के; विधानसभेत फक्त राजेंद्र मस्के अशी घोषणा करत त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र संधी न मिळाल्यानं म्हस्के नाराज झाले आहेत. यंदा विधानसभा लढवण्यासाठी ते उत्सुक आहेत.

बीडमधील राजकीय घडामोडींनी सर्व राजकीय समिकरणे बदलणार आहेत. बीड जिल्ह्यात वंजारी समाज, मराठा समाज मोठ्या प्रमाणावर लोकसभेला मराठा आरक्षण-जरांगे फॅक्टरचा परिणाम पंकजा मुंडेंना लोकसभेला पराभवाचा फटका विधानसभेलाही जरांगे फॅक्टर प्रभाव टाकण्याची शक्यता मराठा समाजाच्या राजेंद्र म्हस्केंमुळे जरांगेंच्या डावाला बळ मिळणार राजेंद्र म्हस्के शरद पवारांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा

बीड जिल्ह्यात भाजपला उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. म्हस्के शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा आहे. सध्याच्या राजकीय संघर्षात बीड जिल्हातील राजकारण कुठल्या वळणावर जाणार हे लवकरच कळेल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT