Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News: 'जे विजयात आडवे आले, त्यांना येत्या निवडणुकीत आडवा करणार', पंकजा मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे?

'जे विजयात आडवे आले, त्यांना येत्या निवडणुकीत आडवा करणार', पंकजा मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे?

विनोद जिरे

Pankaja Munde on Upcoming Elections: ''दूध पोळले आहे, त्यामूळे ताक फुंकून प्यायचे आहे.. 2024 ला इतिहास घडवायचा आहे. 2019 मध्ये जे विजयात आडवे आले, त्यांना येत्या निवडणुकीत आडवा करू'', असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीड शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.

त्या म्हणल्या की, 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली आहे. पक्ष काय ठरवेल ते ठरवेल. माझी मी भूमिका घेतली ती फायनल आहे. पक्षाला त्या भूमिकेची सहमत करून घेणे, हे माझं कर्तव्य आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केला आहे.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोदींचे यशस्वी 9 वर्ष याची माहिती सांगायला मी मध्य प्रदेशमध्ये नक्षल ग्रस्त भागात गेले. मी सुरक्षा नाकारली कारण त्या ठिकाणीं मुंडे साहेबांची आठवण सांगणारे भेटले. (Latest Marathi News)

2019 ला यशामध्ये आडवे येणाऱ्याला निवडणुकीत आडवं करू, अस पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर यायचं यावर्षी चारशे कोटींची मागणी केल्यावर पदरात फक्त 192 कोटी मिळाले.

त्या म्हणाल्या, की, ''वंचित पीडितांची कोणती जात नसते. ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. माझ्या लोकांची कामे जाहली नाही की माझ्या हृदयात दुखते. मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधून घेणार नाही. फेटा घालून मिरवणार नाही.

मुंडे म्हणाल्या, ''काही माध्यमांनी विचारलं, ताई तुम्ही आमदार नाही, खासदार नाही झाले. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. तरी एवढी चर्चा का? त्यावर सर्व समावेशक चेहरा पंकजा मुंडे झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. मी जी भूमिका घेतली ती घेतली. 2024 ला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT