Clash Between Two Groups 
महाराष्ट्र

Pandhrapur Crime: पंढरपुरात दोन गटात तुफान हाणामारी; तलवार, रॉडने एकमेकांना मारहाण

Clash Between Two Groups : पंढरपुरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून शहर आणि परिसरात तणावाचे वातावरण आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत नागणे, साम प्रतिनिधी

पंढरपूर शहरानजीक असलेल्या टाकळी गावात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीय. तलवार, रॉड आणि बंदुकीने एकमेकांनावर हल्ला करण्यात आला असून. या मारहाणीत ७ ते ८ जण जखमी झालेत. याप्रकरणी पंचनामा करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात हाणामारी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे टाकळी गावचे सरपंच संजय साठे यांनी तलवारीने मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केलाय.शिवसेना शिंदे गटाच्या मारहाणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सात ते आठ कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. पंढरपूर शहर आणि परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

भाजप आमदारानं भररस्त्यातच रिक्षाचालकाला कानफटवलं, VIDEO

SCROLL FOR NEXT