pandharpur, railway, youth saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : हेडफोन लावून गाणी ऐकणे बेतले जीवावर; रेल्वेच्या धडकेत युवक ठार

रेल्वेची धडक इतकी जोरात होती की युवकाचे पाय तूटून पडले.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपुरात रेल्वेच्या (pandharpur rail accident news) धडकेत युवकाचा (youth passes away in rail accident near pandharpur) जागीच मृत्यू झाला आहे. हेडफोन लावून गाणी ऐकणे युवकाच्या जीवावर बेतले आहे. घटनास्थळी पाेलिस पाेहचले असून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी : आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयानजिकचा रेल्वे रूळ ओलांडताना युवकास रेल्वेची धडक बसली. रेल्वेची धडक इतकी जोरात होती की युवकाचे पाय तूटून पडले.

कानात हेडफोन घालून रूळ ओलांडत असताना हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या ठिकाणी मोबाईल आणि हेडफोन आढळून आला आहे. घटनास्थळी बघ्यांची माेठी गर्दी जमली हाेती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT