Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: पंढरपुरात गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कालव्यात आढळला; वेळापूर पोलिस ठाण्यात ग्रामस्थांची गर्दी

Velapur News: पंढरपुरात गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कालव्यात आढळला; वेळापूर पोलिस ठाण्यात ग्रामस्थांची गर्दी

भरत नागणे

Pandharpur News: पंढरपूर येथे इयत्ता पहिलीच्या वर्गातील गायब झालेल्या दिती चौगुले या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह  श्रीपूर जवळ एका कालव्यात आढळून आला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास करून आरोपीला तत्काळ अटक करावी‌, या मागणीसाठी खंडाळी येथील‌ ग्रामस्थांनी वेळापूर पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे.

पहिलीच्या वर्गात शिकणारी सहा वर्षाची आदिती चौगुले ही 2 आॅगष्ट रोजी माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील  शाळेतून गायब झाली होती.  या प्रकरणी वेळापूर पोलिस ठाण्यात शाळेच्या वतीने सोमनाथ पांडुरंग सगर यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आज सायंकाळी गायब झालेल्या आदिती चौगुले या मुलीचा‌ मृतदेह  माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील नीरा कालव्यात आढळून आला आहे. आदिती चौगुले ही मुलगी खंडाळी (दत्तनगर) येथील भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकते. 2 आॅगष्ट रोजी ती  सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती.

दुपारच्या सुट्टीमध्ये आदितीने तिच्या मैत्रींसोबत जेवण केले.  जेवणानंतर घरी जाऊन येते, असे सांगून ती गेली होती. त्यानंतर आदिती शाळेत परत आलीच नाही. आज सायंकाळी तीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या हत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT