pandharpur tulsi vrindavan reopens for devotess saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : पंढरपुरातील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुले, QR Code च्या माध्यमातून जाणून घेता येते संतांचे महात्म्य

pandharpur tulsi vrindavan : सुमारे सहा कोटी रूपये खर्च करून तुळशी वृंदावन उभारले आहे.

भारत नागणे

Pandharpur News :

वर्षभरापूर्वी पुंढरपूरातील तुळशी वृंदावनातील (pandharpur tulsi vrindavan) संतांच्या मंदिरांची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले होते. सामच्या बातमीची दखल घेवून वनविभागाने येथील दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले. आता हे काम पूर्ण झाले असून भाविकांना पंढरपूर येथील प्रसिद्ध असलेले तुळशी वृंदावन खुले झाले आहे. (Maharashtra News)

वर्षभरापूर्वी येथील तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा ((Sant Chokhamela) आणि संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) यांची मंदिर कोसळली होती. मंदिरे कोसळल्याची पहिली बातमी साम टीव्हीने दाखवली होती. तसेच येथे दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मांडले हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामच्या बातमीची दखल घेवून वनविभागाने तुळशी वृंदावनातील संतांच्या मंदिर दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. एक वर्षानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

आठ जानेवारी पासून येथील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुले देखील करण्यात आले आहे. यामध्ये नव्याने क्युआर कोड बसवण्यात आले आहेत. या माध्यमातून तुळशीच्या विविध जाती बरोबरच संतांचे महात्म्य भाविकांना जाणून घेता येत आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी खास बाब म्हणून पंढरपुरात तुळशी वृंदावन उभारले आहे. सुमारे सहा कोटी रूपये खर्च करून तुळशी वृंदावन उभारले आहे. भाविकांबरोबरच पर्यटक देखील आवर्जून येथील तूळशी वृंदावनाला भेट देतात.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT