pandharpur 
महाराष्ट्र

प्रशासना विराेधात व्यापा-यांची एकजूट; आंदाेलनाचा आजचा दूसरा दिवस

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये येत्या १३ ऑगस्ट पासून कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने लाॅक करण्याचा निर्णय जाहीर केल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा आदेश रद्द करावा अशी मागणी येथे जाेर धरु लागली आहे.

या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर pandharpur व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मंगळवार पासून आंदोलन सुरू केले आहे. आज (बुधवार) व्यापारी महासंघाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात सतत लाॅकडॉन केले जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच येत्या १३ ऑगस्ट पासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी जाहीर केल्यामुळे व्यापा-यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या निर्णयाचा निषेध म्हणून व्यापा-यांनी तीन दिवस आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी घंटानाद आंदोलनाने त्यास सुरुवात झाली. आज (बुधवार) दुसऱ्या दिवशी सर्व व्यापाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. उद्या (गुरुवार) पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Maharashtra News Live Update: पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

SCROLL FOR NEXT