मुख्याधिकाऱ्यांचा इशारा! लसीकरण कमी झाल्यास सरपंच पद धोक्यात भारत नागणे
महाराष्ट्र

मुख्याधिकाऱ्यांचा इशारा! लसीकरण कमी झाल्यास सरपंच पद धोक्यात

त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल.

भारत नागणे

पंढरपूर: ज्या गावात कोरोना लसीकरण (Corona Vaccine) कमी होईल अशा गावातील सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 64 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींचे 100 टक्के लसीकरण झालेले आहे. अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. लसीकरण वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावांमध्ये दिवाळीपूर्वी तीन दिवसांचा मेगा लसीकरण कॅम्प घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग कमी असेल किंवा लसीकरण अत्यंत कमी होईल अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल.

याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT