Pandharpur Railway Accident saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Railway Accident: पंढरपुरात रेल्वेचा अपघात; 15 ते 20 मेंढ्यांना चिरडलं, मेंढपाळांचं काळीज पिळवटलं

Pandharpur Railway Accident: पंढरपूरातून रेल्वे अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. रेल्वे गाडीने अंदाजे १५ ते २० मेंढ्या चिरडल्याची घटना घडली.

भारत नागणे

Pandharpur Railway accident:

पंढरपूरातून रेल्वे अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. रेल्वे गाडीने अंदाजे १५ ते २० मेंढ्या चिरडल्याची घटना घडली. रेल्वेचा भीषण अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. पंढरपूरपासून जवळ असलेल्या टाकळी बोहाळी दरम्यान हा अपघात घडला. या अपघातामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान झालं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरात भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेची मेंढ्यांना जबर धडक बसली. या रेल्वेच्या धडकेत अंदाजे १५ ते २० मेंढ्यांच्या मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढपूरजवळील टाकळी बोहाळी दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात मेंढपाळांचे लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

अपघात कसा झाला?

कोल्हापूरहून नागपूरकडे निघालेली रेल्वे गाडी पंढरपूरपासून सात किलोमीटर अंतरावर असताना रेल्वे रूळ ओलांडताना काही मेंढ्यांना जोराची धडक बसली. यामध्ये या मेंढ्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, चालकाने 5-10 मिनिटे गाडी थांबवून पाहणी केली. त्यानंतर गाडी पुन्हा मार्गस्थ केली. यावेळी रेल्वेखाली अडकलेल्या मेंढ्यांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेतील काही प्रवाशांनी मदत केली.

मेंढ्या रेल्वे रूळ ओलांडत असताना चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र मेंढ्यांना वाचवता आले नाही. यात मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती‌, अशी माहिती समोर आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Mumbai : धक्कादायक! केईम हॉस्पिटलमध्ये रूग्णाने केली आत्महत्या, हादरवणारे कारण आले समोर

विधानपरिषदेत शिंदेसेनेला 2 जागा; विदर्भातून या नावाची चर्चा, कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT