Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : फोन करून मित्रांना बोलावले; मित्र येताच टाटा...बाय असं म्हणत घेतली तलावात उडी

Pandharpur : ऋतिक बुधवारी रात्री येथील यमाई तलाव परिसरात गेला होता. यावेळी त्याने आपल्या मित्रांना ही भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. मित्र आल्यानंतर ऋतिकने टाटा...बाय असं म्हणत तलावात उडी मारली

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर शहरातील यमाई तलावात उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बोलावले. मित्र येताच त्याने तलावात उडी घेत आत्महत्या केली. आज सकाळी त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणी पोलीस तपासा करत आहेत. 

ऋतिक शंकर कदम (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋतिक हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून कामाला होता. ही दुर्दैवी घटना बुधवारी (२९ जानेवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतिक बुधवारी रात्री येथील यमाई तलाव परिसरात गेला होता. यावेळी त्याने आपल्या मित्रांना ही भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. मित्र आल्यानंतर ऋतिकने टाटा...बाय असं म्हणत तलावात उडी मारली. 

रात्री उशिरापर्यंत शोध 

ऋत्विकने काही न बोलता केवळ टाटा..बाय करत लागलीच तलावात उडी घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याच्या मित्रांना धक्का बसला. यानंतर सोबतच्या मित्रांनी ही घटना त्याच्या घरी सांगितली.‌ यानंतर कुटुंबीय व पोलीस याठिकाणी दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बराच वेळ त्याचा शोध घेण्यात आला. मात्र ऋतिक आढळून आला नाही. यामुळे रात्री त्याचा शोध घेण्याचे थांबविण्यात आले होते. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

दरम्यान आज सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू केली. यावेळी ऋतिकचा मृतदेह सापडला. यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान ऋत्विकने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली; याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस अधिक तपास करत आहेत. येथील पत्रकार शंकर कदम यांचा ऋतिक मुलगा होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

SCROLL FOR NEXT