Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याने मारहाण करत जबरदस्ती शेतजमीन केली खरेदी; शेतकऱ्याच्या आरोपाने खळबळ

Pandharpur News : तीस - चाळीस एकर शेती आहे. तुला कशाला इतकी जमीन पाहिजे. मला तुझी जमीन दे अशी धमकी देऊन मारहाण केली. इतकेच नाही तर त्याला जबरदस्तीने उचलून नेऊन जमिन खरेदी करून घेतल्याचा आरोप केला

भारत नागणे

पंढरपूर : वाल्मीक कराड याच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. यात  राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष (अजित पवार गट) रामेश्वर मासाळ यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दोन एकर शेत जमिन खरेदी केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील शेतकरी नवनाथ प्रकाश व्हरे या शेतकऱ्याने मासाळ यांच्यावर आरोप केला आहे. व्हरे कुटुंबाची गोणेवाडी येथे तीस ते चाळीस एकर शेत जमीन आहे. मात्र सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर मासाळ यांनी शेतकरी नवनाथ व्हरे यांना व त्यांचे वडील प्रकाश व्हरे यांना मारहाण करून १६ जानेवारीला दोन एकर शेत जमिन खरेदी केली आहे.

जबरदस्ती उचलून नेट जमीन खरेदी 
तुझ्याकडे तीस - चाळीस एकर शेती आहे. तुला कशाला इतकी जमीन पाहिजे. मला तुझी जमीन दे अशी धमकी देऊन नवनाथ याला मारहाण केली. इतकेच नाही तर त्याला जबरदस्तीने उचलून नेऊन जमिन खरेदी करून घेतल्याचा आरोप नवनाथ व्हरे यांचे वडील प्रकाश व्हरे यांनी केला आहे. दरम्यान मासाळ यांच्या दहशतीमुळे व्हरे कुटुंब भयभीत झाले असून दहा दिवसांपासून ते घरी देखील गेले नाही. 

पोलिसात तक्रार दाखल 

दरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शेतकरी कुटुंबाला देण्यात आलेल्या त्रासाबाबत आणि जबरदस्तीने जमीन खरेदी केलेल्या या सगळ्या प्रकाराची व्हरे कुटुंबाने मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मायबाप सरकारने आणि अजित पवारांनी न्याय द्यावा; अशी मागणी पिडीत व्हरे कुटुंबाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT