Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठलाच्या मूर्तीची झीज; मूर्तीवर लवकरच इपॉक्सी लेप

Pandharpur News : पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रचे आराध्य दैवत विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने काम करण्यात आले

भारत नागणे

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज झाली आहे. ही झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करावी लागणार असल्याबाबतचे पत्र भारतीय पुरातत्व विभागाने विठ्ठल मंदिर समितीला दिले आहे. त्यानुसार विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे. यामुळे मूर्तीची होणारे झीज थांबविता येणार आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने काम करण्यात आले आहे. अर्थात या कामामुळे मंदिराच्या गाभाऱ्याला साधारण सातशे वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्यात आले आहे. तर पुरातन अशा मूर्तीची झीज टाळण्यासाठी रासायनिक प्रक्रिया देखील अधून मधून करण्यात येत असते.   

पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून झीज झाल्याचे समोर 

विठ्ठल मूर्तीची झीज भरून काढण्यासाठी इपॉक्सीचा लेप लावण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावर तसेच इतर ठिकाणी मूर्तीची झीज झाल्याचे पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. 

पाच वर्षांपूर्वी लावला होता इपॉक्सी लेप

दरम्यान पंढरपूरचे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर हे पुरातन मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती देखील पुरातन आहेत. भाविक दर्शन घेताना मूर्तीला हात लावत असतात. यामुळे काही कालावधीने या मूर्तीची झीज होत असते. याची वेळोवेळी पाहणी करून झीज झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानुसार पाच वर्षापूर्वी विठोबाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप झाला होता. यानंतर आता पुन्हा झीज झाल्याचे समोर आल्याने हि प्रक्रिया पुन्हा केली जाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colon Cancer: कमी वयातच कोलन कॅन्सरचा धोका, ही ४ लक्षणं दुर्लक्षित करूच नका; वाचा डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

भाजप कार्यालय फोडलं; 15-20 हल्लेखोरांकडून नेत्यांवर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Tejashri Pradhan Marriage: तेजश्री प्रधान आणि राकेश बापट लग्न करणार का? अभिनेत्याने विषय संपवला

Mumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम वेगात; १० ठिकाणी इंटरचेंज; वाचा कुठून कसा असणार?

SCROLL FOR NEXT