Chandan Uti Puja Saam tv
महाराष्ट्र

Chandan Uti Puja : विठ्ठल रुक्मिणी चंदन उटी पूजेतून मिळाले १४ लाखांचे उत्पन्न; पूजेसाठी ५३ किलो चंदनाचा झाला वापर

Pandharpur news : उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेपासून विठ्ठल रुक्मिणीचे संरक्षण व्हावे. शिवाय उष्णतेचा दाह कमी होऊन देवाला थंडावा मिळावा यासाठी चंदन उटी पूजा केली जाते. पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी मागणी असते

भारत नागणे

पंढरपूर : गुढीपाडवा ते मृग नक्षत्रपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेला करण्यात येणाऱ्या चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरवर्षी मृग नक्षत्रापर्यंत होणारी पूजा यंदा येत्या १३ जूनला पूजेची सांगता होणार आहे. दरम्यान ३० मार्चपासून सुरु झालेल्या चंदन उटी पूजेसाठी सुमारे ५३ किलो सुगंधित चंदनाचा वापर करण्यात आला आहे. याला भाविकांचा देखील तितकाच प्रतिसाद मिळाला आहे. 

उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेपासून विठ्ठल रुक्मिणीचे संरक्षण व्हावे. शिवाय उष्णतेचा दाह कमी होऊन देवाला थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते. देवाची चंदन उटी पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी मागणी असते. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली जात असते. यावर्षी ३० मार्च गुढीपाडव्याच्या दिवसापासून चंदन उटी पूजा सुरु झाली. साधारण मृग नक्षत्रा पर्यंत पूजा केली जाते. या दरम्यान शुभदिवस पाहून पूजेची सांगता केली जाते.

पूजेतून मंदिर समितीला १४ लाखांचे उत्पन्न
यंदा ३० मार्च ते १२ जून दरम्यान चंदन उटी पूजा करण्यात येत आहे. या ४३ दिवसांमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चंदन उटी पूजेतून सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी २१ तर रुक्मिणीच्या पूजेसाठी ९ हजार रुपये देणगी मूल्य आकारण्यात आले. त्यानुसार ४३ दिवसांमध्ये चंदन उटी पूजेच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर समितीला १४ लाख रुपये देगणी रुपाने मिळणार आहेत. याशिवाय चंदन उटी पूजेसाठी सुमारे ५३ किलो ७५० ग्रॅम इतके सुवासिक चंदनाचा वापर करण्यात आला.  

१३ जूनला होणार समाप्ती 
चंदन उटी पूजेसाठी सर्व दिवसांची बुकिंग झाली आहे. त्यानुसार १३ जून हा दिवस शुभ असल्याने या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेची सांगता होणार आहे. १३ जूनला अनेक वर्षातून सिध्दी योग आला आहे. शिवाय हा दिवस सकारात्मकता आणि दयाळूपणा दर्शवतो. त्यामुळे देवाच्या चंटन उटीपूजेसाठी या शुभ दिवसाची निवड करण्यात आल्याचेही मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT