Vitthal Wari Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Wari : विठुरायाची लंडन वारी; पालखी सोहळ्याचे प्रस्थान, ६५ दिवसांचा असणार प्रवास

Pandharpur News : पंढरपूरमध्ये वर्षभर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. तर आषाढी एकादशीनिमित्ताने पायी वारी करत ७ ते ८ लाख भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात

भारत नागणे

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत सावळ्या विठुरायाच्या भाविकांची संख्या मोठी आहे. यामुळेच सावळ्या विठुरायाची महती आता सातासमुद्रापार गेली आहे. वारकरी सांप्रदायाचा आणि संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजाच्या आध्यात्माचा संदेश जगात पोहचावा, यासाठी पंढरपूर ते लंडन अशी विठुरायारी वारी काढण्यात आली आहे. या वारीचे आज लंडनला प्रस्थान झाले आहे. 

पंढरपूरमध्ये वर्षभर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. तर आषाढी एकादशीनिमित्ताने पायी वारी करत ७ ते ८ लाख भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे विठ्ठल- रुक्मिणीची महती सांगण्याची गरज नाही. आता विठूरायाची महती सातासमुद्रापार पोहचणार आहे. या अनुषंगाने वारकरी सांप्रदायाचा आणि संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजाच्या आध्यात्माचा संदेश जगात पोहचवण्याच्या अनुषंगाने विठूरायाची वारी लंडनला काढण्यात आली आहे. 

लंडनला उभारले जाणार विठ्ठल- रुक्मिणी मंदिर 
दरम्यान आज सकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पादुकांची विधिवत पूजा करून वारीने लंडनच्या दिशेने प्रस्थान केले आहे. मुळ पुणेरी असलेले परंतु सध्या लंडन येथे स्थायिक झालेले अनिल खेडकर यांनी वारीचे आयोजन केले आहे. यु.के. येथील मराठी मंडळाने लंडन येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यापूर्वी या मंडळाने पंढरपूर ते लंडन अशी १८ हजार किलोमीटरची वारी काढली आहे.

६५ दिवसांचा प्रवास 
पंढरपूर येथून आज वारीचे प्रस्थान झाले आहे. यानंतर विठुरायाची लंडन वारी २१ जून रोजी लंडनमध्ये पोचणार आहे. वारीचा एकूण ६५ दिवसांचा व २२ देशांमध्ये प्रवास असणार आहे. यानंतर या पादुका एका विशेष कारने लंडनमध्ये जाऊन पोहोचणार आहेत. प्रथमच काढण्यात आलेल्या वारीमुळे विठ्ठलाची वारी आता वर्ल्ड वाईड झालेली दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT