Pandharpur Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Yatra : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद; गोपाळपूरपर्यंत दर्शन रांग 

Pandharpur News : आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत असताना देखील व्हीआयपी दर्शन सुरु होते. याबाबत साम टीव्हीने व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांचे हाल अशी बातमी प्रसिद्ध केली होती.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढती आहे.  लांब रांगा लागत असून आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे असे नियोजन मंदिर समितीने केले आहे. या दरम्यान आता आषाढी यात्रेनिमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी असलेले व्हीआयपी दर्शन आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांची दर्शन रांग लवकर पुढे सरकणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्ताने (Pandharpur) पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत असताना देखील व्हीआयपी दर्शन सुरु होते. याबाबत साम टीव्हीने व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांचे हाल अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दर्शन रांगेतील (Ashadhi Wari) भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय दर्शन रांग देखील लवकर पुढे सरकण्यास मदत होत आहे.   

गोपाळपूर पर्यंत दर्शन रांग 

आषाढी यात्रा आजपासून विठुरायाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत दर्शन बारी गेली आहे. जवळपास दहा पत्रा शेडपैकी पाच पत्राशेड भाविकांच्या गर्दीने भरले आहेत. पुढील दिवसात भाविकांची आणखीन गर्दी होण्याची शक्यता देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

Car Care Tips: हे करून पाहा.. मग तुमच्या गाडीचा रंग केव्हाही उडणार नाही

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT