Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: दानपेटी बनावट सोने चांदीचे दागिने; मंदिर समितीची वाढली डोकेदुखी

दानपेटी बनावट सोने चांदीचे दागिने; मंदिर समितीची वाढली डोकेदुखी

भारत नागणे

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाला वर्षभरात कोट्यावधी रुपयांचे दान अर्पण केले जाते. यामध्ये काही भाविक श्रद्धेपोटी रोख रक्कमे बरोबरच सोने, चांदी, पितळ अशा धातूच्या वस्तूही दान पेटीत टाकतात. यामध्ये आता सोने– चांदीच्या (Gold And Silver) बनावट वस्तू आढळून आल्या आहेत. आता याच बनावट वस्तुंची विल्हेवाट कशी लावायची याचीच चिंता मंदीर समितीला लागली आहे. (Letest Marathi News)

मंदिर समितीच्या (Pandharpur) उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अनेक भाविक सोन्याचे दागिने देवाला अर्पण ‌करतात. तर अनेक गोरगरीब भाविक श्रद्धेपोटी सोने चांदीच्या प्रतिकात्मक वस्तू ही दान पेटीत अर्पण करतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने अशा प्रतिकात्मक वस्तू अधिक प्रमाणात दान‌पेटीत जमा झाल्या आहेत. दानपेटी जमा झालेल्या पैशाची मोजणी करताना असे बनावट दागिने आढळून आले आहेत.

तीन पोते बनावट दागिने जमा

वर्षभरातील जमा झालेले असे दागिने तीन पोत्यामध्ये जमाकरून ठेवले आहेत. अशा दागिन्यांची कशी आणि कुठे विल्हेवाट लावायची याचीच चिंता आणि काळजी मंदिर समितीच्या अधिकार्यांना लागली आहे. भाविकांनी दान करण्यासाठी सोने– चांदीच्या वस्तू खरेदी करताना दुकानदाराकडून पावती घ्यावी; म्हणजे फसवणूक होणार नाही असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT