Pandharpur Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाख भाविक दाखल; दर्शन रांगेचे दहा पत्रा शेड हाउसफुल्ल

Pandharpur News : पंढरपुरात भक्तीचा मळा भरण्यास सुरवात झाली आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गर्दी आता वाढू लागली आहे. आज जवळपास तीन लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून भाविकांची गर्दी अजूनही वाढतीच आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शनाची दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेली आहे. 

पंढरपुरात (Pandharpur) भक्तीचा मळा भरण्यास सुरवात झाली आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. शिवाय आता पायी वारी करत निघालेल्या पालखी दिंड्या देखील दाखल होत असल्याने भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. चंद्रभागा स्नान करून भाविक दर्शनासाठी रांगेत लागत आहेत. तर आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू झाला आहे.  

१० पत्राशेड झाले भाविकांनी फुल्ल 

पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची रीघ सुरूच आहे. आजच्या स्थितीला तीन लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून येत्या दोन दिवसात भाविकांची संख्या ५ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मंदिर समिती व प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. विठूरायाचे (Vitthal Mandir) दर्शन घेण्यासाठी असलेल्या दर्शन रांगेसाठी तयार केलेले दहा पत्राशेड भाविकांच्या गर्दीने आतापासूनच हाउसफुल्ल झाले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून पाणी चहा नाश्ता आधी सोय उपलब्ध करून दिली आहे. २४ तास दर्शनाची व्यवस्था सुरु असल्याने दर्शन घेऊन भाविक लागलीच बाहेर पडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT