Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena : विठुराया आरोग्य मंत्रिपद दे रं! तानाजी सावंत यांच्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांचं साकडं

Pandharpur News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार हे निश्चित होते.

भारत नागणे

पंढरपूर : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर आता कोणाला मंत्री पद मिळणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान पंढरपुरात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने विठ्ठलाची महाआरती करत तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्यमंत्री करा; असे साकडे विठ्ठलास घालण्यात आले.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार हे निश्चित होते. मात्र मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा होत असल्याने बारा- तेरा दिवसांनी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ५ डिसेंबरला पार पडला. यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्री पद कोणाला याची प्रतीक्षा आहे. 

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा करताना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्री पद जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावे अशी प्रार्थना केली जात आहे. त्यानुसार पंढरपुरात देखील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून विठुरायाची महाआरती करत साकडे घालण्यात आले आहे. 

एकीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे रणजी सावंत याना मंत्री पद मिळावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन - कीर्तन करत आमच्या भावाला आरोग्यमंत्री करा; अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात दिसून आले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तरापूर्वीच तानाजी सावंत यांच्या आरोग्यमंत्री पदासाठी शिवसैनिक आणि महिला आग्रही झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT