Sikandra Shekh Latest News Saamtv
महाराष्ट्र

Sikander Shaikh : जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी मीच; पैलवान सिकंदर शेखचा दावा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चर्चेत आलेल्या पैलवान सिकंदर शेखने नवा दावा केला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चर्चेत आलेल्या पैलवान सिकंदर शेखने नवा दावा केला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी मीच आहे, असं सिकंदर शेख याने म्हटलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मी हरलो‌ असलो, तरी महाराष्ट्रातातील जनतेला सर्व काही माहिती आहे, असं म्हणत त्याने पंचांच्या निर्णयाबद्दल खंतही व्यक्त केली आहे.  (Latest Marathi News)

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपुरात (Pandharpur) कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत सिकंदर शेख सहभागी होण्यासाठी आला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने ही खंत व्यक्त केली आहे.

काय म्हणाला सिकंदर शेख?

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर मी पहिल्यांदाच मोठ्या मैदानात खेळतो आहे. जनता एवढं माझ्यावर प्रेम करतेय, हे पहिल्यांदाच बघतो आहे, उगाच म्हणत नाहीत की सगळ्यांच्या मनातला महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) मीच आहे, जरी मी स्पर्धेत हरलो असलो तरी सगळ्यांच्या मनात मीच महाराष्ट्र केसरी आहे, हे सगळं प्रेम बघून खूप आनंद झाला, अशा भावना सिकंदरने व्यक्त केल्या.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मी हरलो‌ असलो तरी महाराष्ट्रातातील जनतेला माहिती आहे असं म्हणत त्याने पंचांच्या निर्णया बद्दल खंत व्यक्त केली. यावेळी त्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मीच महाराष्ट्र केसरी असल्याचा दावा केला आहे. कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर कोल्हापूर सांगली या भागातून पैलवान व कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पैलवान सिकंदर शेख मूळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा रहिवाशी आहे. महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी तो प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, माती विभागातील पैलवान महेंद्र गायकवाड याने उपांत्य फेरीतच सिकंदर शेखचा पराभव केला. पंचांनी फक्त फ्रंट कॅमेरा पाहिला, बॅक कॅमेरा पाहिला नाही आणि चुकीचा निर्णय दिला, असा आरोप सिकंदरने केला केला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

SCROLL FOR NEXT