Sandipan Bhumre Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Sandipan Bhumre News : राम मंदिर होतेय याला महत्त्व, पैशाला नाही; संदीपान भुमरे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Pandharpur News : आम्ही बिनधास्त आहोत. दहा तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही. समोरच्याला धाकधूक आहे.

भारत नागणे

पंढरपूर : कोणी किती पैसे दिले, यापेक्षा राम मंदिर होत आहे याचा आनंद आहे. आम्ही अनेक वेळा अयोध्या दौरा केला आहे. कुणी काय दिले या पेक्षा मंदिर होत आहे याला महत्त्व आहे; पैशाला महत्व नाही. राम मंदिरासाठी त्यावेळी (Shiv Sena) शिवसेनेतील सर्वांनीच सहभाग दिला असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या १ कोटीच्या राम मंदिर देणगीवर रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी ठाकरे यांना टोला लगावला आहे. (Live Marathi News)

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना झोपेत सुद्धा सरकार पडण्याच्या तारखा दिसतात. सरकार कधी जाणार हे सांगणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भविष्यकार आहेत. झोपेतून उठले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमचे सरकार दिसते. त्यांना रात्री झोपेत स्वप्न पडतात १ तारीख २ तारीख अशा तारखा दिसतात आणि ते सकाळी उठून माध्यमांसमोर बोलतात. अशा पद्धतीने सरकार पडण्याच्या टीकेवर खिल्ली उडवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निकाल आमच्याच बाजूने 
आम्ही बिनधास्त आहोत. दहा तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही. समोरच्याला धाकधूक आहे. आम्ही जे काही केले ते कायदेशीर बाजू तपासून केलं आहे. आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल; अशी प्रतिक्रिया भूमरे यांनी आमदार अपात्र प्रकरणावर दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT