Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News : धुलीवंदनाच्या दिवशीच पंढरपुरात आढळलं २०८ किलो गोमांस, विठ्ठलाच्या पंढरीत चाललंय तरी काय?

Crime News In Pandharpur : पंढरपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळवडीच्या दिवशी पोलिसांनी दोघांकडून तब्बल २०८ किलो गोमांस पकडले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

भरत नागणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

देशभरात काल धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी लोकांनी रंग उधळून रंगाचा सण साजरा केला. पण याच दरम्यान पंढरपूरहून धक्कादायक प्रकार घडला. धुलीवंदनाच्या दिवशीच पंढरपूरमध्ये विक्रीसाठी आणलेले २०८ किलो गोमांस पोलिसांनी पकडले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काल धुलीवंदनाच्या दिवशी ठिकठिकाणी मटण खरेदी करण्याची लोकांनी अनेक दुकानांसमोर गर्दी केली होती. मटण विक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याच दरम्यान पंढरपूर शहरातील आंबेडकर नगर परिसरात गोमांसाची विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसानी आंबेडकर नगर परिसरातल्या ठराविक ठिकाणी छापा मारला. कारवाईदरम्यान पोलिसांनी खंडू दत्तात्रय वायदंडे आणि सोहेल अस्लम कुरेशी या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडे असलेले २०८ किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन धुलीवंदनाच्या सणाच्या दिवशी पंढरपूर सारख्या ठिकाणी गोमांस आढळल्याने मोठी खळबळ उडाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पण या प्रकरणातील दोन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. हे आरोपी गोमांस कुठून आणून कोणाला विकत होते याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT