Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : नव्या वर्षात विठ्ठल पूजेचे ऑनलाईन बुकिंग; १ जानेवारीपासून होणार सुरवात

Pandharpur News : विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला तशी यंत्रणा कार्यान्वीत केली

भारत नागणे

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे काही भाविक हे पूजा करत असतात. यासाठी विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आता नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन वर्षात हि सुविधा सुरु करण्यात येत असून १ जानेवारीपासून भाविकांनी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी यंत्रणा देखील कार्यान्वीत केली आहे. नव्या वर्षातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजांचे बुकिंग हे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या नव्या संगणकीय प्रणालीमुळे वशिलेबाजीला चाप बसणार आहे. भाविकांमधून मंदिर समितीच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

तीन महिन्यासाठी बुकिंग 

पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठी हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यासाठी येत्या १ जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरु केली जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावरच हि ऑनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. 

घरी बसल्या करता येणार नोंदणी 

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नव्याने सुरु केलेल्या या प्रणालीचा भाविकांना फायदा होणार आहे. आतापर्यंत भाविकांना पूजेची बुकिंग करण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागत होते. किंवा थेट पूजेसाठी जाताना प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र भाविकांना आता घर बसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. यामुळे दिलेल्या दिवशी भाविकांना थेट हजर रहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT