Pandharpur Police Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपुरात २४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पकडले; गर्दीत भाविकांचे दागिने लांबविणारी टोळी ताब्यात

Pandharpur News : पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्ताने दर्शनांसाठी लाखो भाविक दाखल होत आहेत. आताच नव्हे तर मागील काही दिवसांपासून भाविकांची गर्दी सुरूच आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चोरटे हात साफ करत होते. पंढरपूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत नामदेव पायरी व बस स्थानक परिसरातून भाविकांचे चोरीला गेलेले २४ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने शोधून काढून ते जप्त केले आहेत. या प्रकरणी १३ चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पंढरपुरात (Pandharpur) आषाढी एकादशीनिमित्ताने दर्शनांसाठी लाखो भाविक दाखल होत आहेत. आताच नव्हे तर मागील काही दिवसांपासून भाविकांची गर्दी सुरूच आहे. या गर्दीत चोरटे संधी साधत असल्याचे पाहण्यास मिळाले. गेल्या काही महिन्यांत विठ्ठल मंदिर परिसरातून  भाविकांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. वारीच्या तोंडावर पंढरपूर शहर पोलिसांनी (Police) मागिल काही महिन्यात झालेल्या चोऱ्यांचा तपास केला असता यामध्ये १३ संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३४ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने हस्तगत केले आहेत. 

पोलीस यंत्रणा सज्ज 

दरम्यान यंदाची आषाढी वारीसाठी मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीचा फायदा उचलत चोरटे हात साफ करत असतात. यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज झाले आहेत. शिवाय यात्रा कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडू नयेत, यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक टोल नाक्यावर वाहन चालकांची तपासणी केली जाणार असल्याचे  पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT