Sangola News Saam tv
महाराष्ट्र

Sangola News : गटशिक्षणाधिकारी कार्यालयास ठोकले कुलूप; सांगोला तालुक्यात शिक्षक कमी असल्याने पालक संतप्त

Pandharpur News : सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत १३० शिक्षक कमी आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत

भारत नागणे

पंढरपूर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. त्यापूर्वीच सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची संख्या कमी असल्या कारणाने पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यलायाला कुलूप ठोकले आहे. शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

राज्यात शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. अशातच सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत १३० शिक्षक कमी आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत असते. याच मुद्द्यावर आज (Sangola) सांगोला येथे गटशिक्षण अधिकारी कार्यालयास संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. यामुळे शाळा सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वी सांगोल्यात शाळांतील शिक्षकांना प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठत गेटवर घोषणाबाजी करत (Zp School) जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक मिळालेच पाहिजे; अशी मागणी करण्यात आली. तसेच याबाबत संतप्त पालकांनी माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांची भेट घेतली. या प्रसंगी माजी आमदार साळुंखे यांनी शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर आक्षेप घेतला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT