Pandhapur News Saam tv
महाराष्ट्र

Pandhapur News : काॅंग्रेस, शिंदे गट विरोधात धनगर समाज आक्रमक; भंडारा उधळून केला निषेध

Pandharpur News : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक मतदार संघातून उमेदवार निश्चित केला जात आहे

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात धनगर समाज काॅंग्रेस आणि शिंदे गटा विरोधात आक्रमक झाला आहे. राज्यात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने एक देखील उमेदवार दिला नाही. याचा निषेध म्हणून काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक मतदार संघातून उमेदवार निश्चित केला जात आहे. अर्थात प्रत्येक भागातील राजकीय समीकरण पाहून हि उमेदवारी दिली जात आहे. मात्र धनगर समाजाचा एक देखील उमेदवार देण्यात आलेला नाही. या विरोधात समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान (Pandharpur) पंढरपुरातील प्रसिद्ध होळकर वाड्यात धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये भंडारा उधळून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याची शपथ घेतली.

दोन्ही पक्षांविरोधात करणार प्रचार 

राज्यात दोन कोटी धनगर समाज आहे. मात्र काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा  धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT