Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपुरात शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार असेल तरच प्रचार; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य

Pandharpur News : पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षांमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरू आहे. याठिकाणी महाविकास आघाडीतील शरद पवार गट व काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी उमेदवारीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

लोकसभेला शरदचंद्र पवार पक्षाने आघाडीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे आता (Pandharpur News) पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार असेल, तर आम्ही त्यांचा प्रचार करून महाविकास आघाडीचा धर्म पाळू; असे विधान (Congress) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. अनिल सावंत हे उमेदवार राहिले; तर काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपला धर्म पाळेल; असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनिल सावंत यांची उमेदवारी कायम राहील असे संकेत महाविकास आघाडीमध्ये दिले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT