Bhima Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुक; प्रचारात दोन गटात राडा, कामगारांवर भिरकावले दगड

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुक; प्रचारात दोन गटात राडा, कामगारांवर भिरकावले दगड

भारत नागणे

पंढरपूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीतील सत्ता संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. कारखान्याचे विद्यमान संचालक प्रभाकर देशमुख आणि कारखान्याच्या कामगारांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संचालक देशमुख यांनी विरोधात प्रचार का करता असा जाब विचारत कामगारांवर दगड भिरकावले. (Tajya Batmya)

वरकुटेमध्ये आज सत्ताधारी चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक संचालक प्रभाकर देशमुख यांनी साखर कारखाना कामगारांना विरोधात (Election News) प्रचार का करता? असे म्हणत कामगारांना धक्काबुक्की केली. मारहाण करण्यासाठी दगड उचलले. यामुळे मोहोळ व पंढरपूर (Pandharpur) परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप

या सदर प्रकारात संचालक प्रभाकर देशमुख यांनी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. तर विरोधी राजन‌ पाटील गटाच्या लोकांनी माझी गाडी अडवून धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रभाकर देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात पुन्हा एकदा निवडणुका, विधान परिषदेच्या १६ जागांसाठी धुरळा, वाचा वेळापत्रक

रुपयाची घसरगुंडी! डॉलरच्या तुलनेत शंभरीकडे वाटचाल, आर्थिक संकटाची चाहूल? VIDEO

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे ७१०० रुपयांनी स्वस्त; वाचा २२, २४ अन् १८ कॅरेटचे दर

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात

पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय, करात ३ रुपयांची वाढ, इंधनाच्या दरात आणखी वाढ होणार होणार?

SCROLL FOR NEXT