Pandharpur Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर; ७ लाख भाविक दाखल

Pandharpur News : आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याची आस वारकरी व भाविकांना लागलेली असते. या आषाढी निमित्ताने भाविक पंढरपुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. उद्या आषाढी एकादशी असल्याने या सोहळ्याच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीत अक्षरशः भक्तीचा महापूर वाहू लागला आहे. पंढरपुरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर भाविकांची मांदियाळी झालेली पाहण्यास मिळत आहे. 

आषाढी एकादशीला पंढरपूरच्या (Pandharpur) विठुरायाचे दर्शन घेण्याची आस वारकरी व भाविकांना लागलेली असते. या आषाढी निमित्ताने भाविक पंढरपुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शिवाय मागील महिनाभरापासून राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून पायी वारी करत निघालेल्या सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. यामुळे वारकरी व भाविकांच्या गर्दीची मांदियाळी येथे पाहण्यास मिळत आहे. उद्या (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशी असताना आजच्या दिवशी जवळपास ६ ते ७ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. 

पंढरपुरात यावर्षी किमान १६ ते १७ लाख भाविक वारीसाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार भाविकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. पंढरीत विठू नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. पंढरपुरातील महाद्वार चौकात तर भाविकांच्या गर्दीचा महापूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर चंद्रभागा नदीत देखील स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT