Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022 live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' चा समारोप

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातही आषाढी एकादशी उत्साहात साजरी

आज आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपूरसह संपूर्ण राज्यात आहे. पुण्यातही प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या सिंहगड रोडवरील मंदिरात आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिराच्या बाहेर भाविक मोठ्या संख्येन रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. गेली दोन वर्षे कोरोना होता. त्यामुळे मंदिरे बंद होती, आषाढी एकादशी ही झाली नव्हती त्यामुळे यावर्षी आषाढी एकादशीचा साजरी होते. पुण्यातील या मंदिराला फुलांची आणि लाईटींग सजावट करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

नाशिकमध्ये देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याच पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' चा समारोप

आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून मिळाला नवले दाम्पत्याला मान

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्यातील रुई गावच्या मुरली भगवान नवले या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला.

मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. ते संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. त्यांना हा मान मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुराया चरणी साकडं

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यावरील सर्व संकट दूर व्हावेत असं साकडं घातलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजा करताना मंदिराचा गाभारा विठुमाउलीच्या जयघोषात दुमदुमून गेला. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT