laxman hake Saam tv
महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

pandharpur madha clash : अंजनगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला आहे. लक्ष्मण हाके यांनी सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचे समोर आलं आहे.

भरत नागणे

सोलापूरच्या माढ्यातील वाद चिघळला

जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला हाकेंकडून धक्काबुक्की

घटनास्थळी तणावाचं वातावरण

पंढरपूरच्या अंजनगावमध्ये मोठा राडा झाला आहे. अंजनगाव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात वाद पेटला आहे. वादानंतर अंजनगावात लक्ष्मण हाके देखील पोहोचले आहेत. याच गावात असलेल्या खेलोबा मंदिराच्या जागेची मोजण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरातील वातावरण चिघळलंय.

अंजनगाव खेलोबा मंदिराच्या जागेची मोजणी करून पुतळ्याचा निर्णय घेतला जाणार होता. या पार्श्वभूमीवर घटनास्थळी दोन्ही गटाचे व्यक्ती,पोलीस आणि शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात जमले होते. मंदिराच्या जागेची मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी पुढे आले. परंतु त्याचवेळी हाके यांनी शासकीय कर्मचाऱ्याला मोजणी करण्यापासून रोखले.

हाके पुढे धावल्यानंतर पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली. हाके यांना रोखल्याने घटनास्थळी वातावरण चिघळल्याचे समोर आलं. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. लक्ष्मण हाके यांनी शासकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मोजणी रोखल्याने वाद टोकाला गेला आहे.

हाकेंना अटक करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

अंजनगावातील वादात मराठा क्रांती मोर्चानेही उडी घेतली आहे. लक्ष्मण हाके यांच्यावर अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय महेश डोंगरे पाटील यांनी केली आहे.

लक्ष्मण हाके यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील महेश डोंगरे पाटील यांनी दिलाय. मराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT