Ashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari : पंढरपूरच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट; माळशिरस तालुक्यात कोरोनाची एंट्री

Pandharpur News : राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान कल्याणमध्ये कोरोनामुळे दोघांना मृत्यू देखील झाला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्र अलर्ट झाली आहे

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. राज्यात अनेक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आता पंढरीच्या वेशीवर येऊ ठेपला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माळीनगर येथे दोन नवे कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आषाढी वारीवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. या नव्या संकटामुळे आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे. 

जगात कोरोनाची महामारी पसरल्यानंतर २०२० व २०२१ या दोन वर्षात या महामारीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर महामारी कमी झाली असताना कोरोनाचे नवीन व्हेरिएन्ट आले. मात्र यातून जग सावरत असताना आता पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान कल्याणमध्ये कोरोनामुळे दोघांना मृत्यू देखील झाला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्र अलर्ट झाली आहे. 

आषाढी वारीवर कोरोनाचे सावट 

दरम्यान आषाढी एकादशीसाठी येत्या १८ जून रोजी संत तुकाराम महाराज तर १९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. तर येत्या ६ जुलैला आषाढीचा मुख्य सोहळा पंढपुरात साजरा होणार आहे. आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात. मात्र माळशिरस तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने आषाढी वारीवर कोरोनाचे सावट पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार 

आता संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अकलूज आणि माळीनगर या गावात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. या दोन्ही संशयित कोरोना बाधीत रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती माळशिरसच्या वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT