tanaji sawant 
महाराष्ट्र

राज्यातील दिवस बदलतील, मी वेगळ्या रुपात समोर येईन; शिवसेना आमदार सावंतांचे सुचक वक्तव्य

राज्यातील दिवस बदलतील, मी वेगळ्या रुपात समोर येईन; शिवसेना आमदार तानाजी सावंतांचे सुचक वक्तव्य

भरत नागणे

पंढरपूर : राज्यात सत्ता बदलाची चर्चा भाजप नेते करत असतानाच आता सत्ताधारी शिवसेनेच्या एका माजी मंत्र्यानेच येत्या तीन– चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलतील. पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. काही मागायचे ते मागा असे सांगत त्यांनी सत्ता बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आली आहे. (pancharpur-news-state-will-change-come-forward-differently-Shiv-Sena-MLA-Sawant-suggestive-statement)

परांड्याचे शिवसेना आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांनी हे वक्तव्य केले आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हीडीओ सोशल मिडीयात (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हीडीओची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष नुकताच समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा हा व्हीडीओ समोर आल्याने शिवसेना (Shiv Sena) आमदारातील नाराजी व खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

युतीमुळे अनेक मंत्रीपदापासून दूर

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), कॉंग्रेससोबत (Congress) युती केल्यामुळे अनेकांना मंत्री पदापासून दूर राहावे लागले आहे. त्यातच शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवसेना आमदारांमध्ये झुपी नाराजी आहे. त्यातूनच आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले असावे असा अदांज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT