Palghar News  Saam tv
महाराष्ट्र

Political News : भाजपमधील अंतर्गंत वाद चव्हाट्यावर; मंत्र्यासमोरच २ गटात जोरदार शाब्दिक चकमक, Video Viral

पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर : पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या स्वागत समारंभात भाजपमधील २ गटांचा वाद समोर आला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा प्रकार घडला. या दोन गटाच्या शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या स्वागत समारंभात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा प्रकार समोर आला. क्रिकेट शार्दुल ठाकूरच्या मंडपातून बाहेर पडत असताना घटना घडली.

भाजपच्या (BJP) दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. डहाणूनगर परिषदचे नगराध्यक्ष भरत राजपूत गट आणि मंत्री रवींद चव्हाण यांच्या गटात जोरदार शाबदिक चकमक झाली आहे.

पालघरमध्ये भाजपमधील दोन गटात शाब्दिक चकमक झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. भाजपमधील दोन गटातील मतभेद समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे पक्षातील कार्यकर्त्यांमधील मतभेदाचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पालघरमध्ये शार्दुल ठाकूरच्या लग्नाची धामधूम

दरम्यान, शार्दुल ठाकूरने नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. २७ फेब्रुवारी रोजी तो मिताली पारूलकरसोबत विवाह बंधनात अडकला. २०२१ मध्ये दोघांचाही साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. आता तब्बल १५ महिन्यांनंतर दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

शार्दुलच्या मित्र मंडळींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी लग्नसमारंभासाठी हजेरी लावली. तसेच भाजपसहित इतर राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील शार्दुलच्या लग्नाला हजेरी लावली. सोशल मीडियावर देखील शार्दुल ठाकूरच्या विवाहाचे फोटो व्हायरल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT