Palghar youth Died At Cricket Ground Saam Tv
महाराष्ट्र

Palghar News: सलग तिसरा षटकार मारताना २७ वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक, क्रिकेटच्या मैदानावर आयुष्याचा डाव मोडला

Palghar youth Died At Cricket Ground: पालघरमध्ये क्रिकेट खेळताना एका तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. अवघ्या २७ व्या वर्षी या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

रूपेश पाटील, पालघर

क्रिकेट खेळताना तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोणाचा हार्ट अटॅकने तर कोणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. अशीच एक घटना पालघरमध्ये घडली आहे. सलग तिसरा षटकार मारताना एका २७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅक आला. यामध्येच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्रिकेटच्या मैदावर अवघ्या २७ व्या वर्षी आयुष्याचा डाव मोडल्यामुळे पालघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला. कोपर गावातील सागर वझे (२७ वर्षे) या तरुणाचा गावातच क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेमुळे कोपर गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी लागोपाठ दोन चेंडूवर दोन षटकार मारले मात्र तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागीच कोसळला.

सागर मैदानावर कोसळल्यामुळे आधी सर्वांना त्याला काय झाले हे कळाले नाही. पण जागीच त्याचा मृत्यू झाला. सागरला या अगोदर हार्ट अटॅक आला होता. तेव्हा डॉक्टरने त्याला क्रिकेट खेळात बंदी घातली होती. मात्र क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला. सागरची फलंदाजी येताच त्याने दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. मात्र तिसरा षटकार ठोकत असताना त्याला हार्ट अटॅक आला.

सागर मैदानावर कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले. तरुण वयातच सागरचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने आता त्याचा खेळ पाहता येणार नसल्याची खंत या परिसरातील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूनी व्यक्त केली. सागरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT