Palghar Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: चौथी मुलगी झाली! आईनेच नकोशीचा जीव घेतला, नाकतोंड दाबून २ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या

palghar Crime: चौथी मुलगी झाल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने आपल्याच हाताने पोटच्या बाळाचा जीव घेतला. पालघरच्या डहाणूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली आहे.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये आईनेच आपल्या नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चौथी अपत्य देखील मुलगीच झाल्याने आईने हे टोकाचे पाऊल उचलले. नकोशी झालेल्या नवजात मुलीची आईने नाकतोंड दाबून हत्या केली. पालघरच्या डहाणू लोणीपाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. कोलकत्याहून ही महिला आपल्या माहेरी डहाणू येथे आली होती. या प्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करत आईला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या डहाणूमध्ये राहणाऱ्या पुनम शहा या महिलेने आपल्या नवजात बाळाची हत्या केली. पूनम काही दिवसांपूर्वीच डहाणूमधील माहेरी आली होती. पूनमला आधीच ३ मुली आहेत. त्यात चौथी मुलगी झाल्यामुळे पूनम नाराज झाली. तिने आपल्या दोन दिवसांच्या नवजात बाळाच्या नाकावर आणि तोंडावर हात ठेवून बाळाचा श्वास रोखून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक करून पुढील तपास सुरू आहे.

पूनम शहा डिलिव्हरीसाठी आईकडे आली होती. गेल्या आठवड्यात लोणीपाडा येथे पूनमची गृहप्रसूती झाली होती. त्यानंतर तिला बाळासह उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे दाखल करण्यात आले होते. पूनमने गोंडस मुलीला जन्म दिला होता. पण चौथी मुलगी झाल्यामुळे पूनम नाराज झाली. तिने आपल्या पोटच्या बाळाचा जीव घेतला. पूनम शहाने चौथी मुलगी झाल्याने नाक तोंड दाबून तिचा जीव घेतला. उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT