Palghar Road Accident update : राज्यात रोड भीषण अपघाताचं सत्र सुरुच आहे. पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जाताना भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृ्त्यू झाला आहे. या अपघातामुळे दोघांच्या कुटुंबावर नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पालघरच्या डहाणू तालुक्यातून गुजरातकडे जाताना हा अपघात झाला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेवरून खड्ड्यात कोसळली. या कारमधील पती-पत्नीने सीट बेल्ट लावल्याने जखमी झाले. या कारमध्ये बसलेले व्याही रमलाबेन आरीवाला आणि अमृतालाल घिवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात चालक आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मीमातेच्या दर्शनासाठी जाताना भीषण अपघात झाला आहे. या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा जागेतच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घिवाला यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मयत गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्याप्रमाणे दोघांचा अपघाती निधन झालं. ४ सप्टेंबर २०२२ रोजी एका अलिशान गाडीमधून गुजरातमधून येथून मुंबईकडे परतताना सायरस मिस्त्री यांच्या वाहनाने चारोटीजवळील भीषण अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोल यांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.