Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar : चोरीचा मोबाईल घेऊन पळाला अन् कोसळला ५० फूट खोल विहिरीत; चोरटा गंभीर जखमी

Palghar News : चोरलेला मोबाईलचा लॉक पॅटर्न ओपन करण्यासाठी मोबाईल शॉपमध्ये गेला. यावेळी या चोरट्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने मोबाईल शॉप चालकाला संशय आल्याने त्याने विचारपूस सुरू केली

रुपेश पाटील

पालघर : चोरी केलेला मोबाईल दुकानात घेऊन आल्यानंतर आपण पकडले जाणार या भीतीने मोबाईल घेऊन पळून गेला. मात्र पळून जाताना हा चोरटा थेट ४० ते ५० फूट खोल विहिरीत जाऊन पडला. विहीर खोल असल्याने त्याला जबर मार लागला असून त्याला स्थानिक नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पालघरच्या वाणगाव येथे हि घटना घडली आहे. मोबाईलची चोरी केल्यानंतर एक चोरटा सायंकाळी उशिरा चोरलेला मोबाईलचा लॉक पॅटर्न ओपन करण्यासाठी मोबाईल शॉपमध्ये गेला. यावेळी या चोरट्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने मोबाईल शॉप चालकाला संशय आल्याने त्याने विचारपूस सुरू केली. परंतु आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने चोरट्याने मोबाईल घेऊन तेथून पळ काढला.  

अंधारात विहीर न दिसल्याने कोसळला  

हा प्रकार घडला यावेळी बाहेर अंधार पडला होता. अंधारातच हा चोरटा पळत सुटला. यानंतर वानगाव नाक्याजवळ असलेल्या जुन्या विहिरीचा अंदाज न आल्याने हा चोरटा अंधारात थेट ४० ते ५० फूट खोल असलेल्या विहिरीतील पाण्यात पडला. विहिरीत पडल्याने त्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक विहिरीच्या दिशेने आले असता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केले.  

बाहेर काढत नेले रुग्णालयात 

या मोबाईल चोरट्याला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने बाहेर काढलं. खोल विहिरीत पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला वाणगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

Kalyan: अधिकाऱ्यांना मारले, आता ते आम्हाला पण मारतील; फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा, शिंदेंचे नगरसेवक आक्रमक

SCROLL FOR NEXT