Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar : खड्ड्यामुळे बस सेवा बंद; शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Palghar News : रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे बस सेवा बंद झाली असून चार ते पाच किलोमीटरचा पायी प्रवास शाळकरी विद्यार्थींना करावा लागत आहे, पावसाळ्याचे दिवस असल्याने हा प्रवास धोकेदायक आहे

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

वाडा (पालघर) : वाडा बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे निशेत, ठाकूर पाडा येथील बस सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे रोज शाळेत जाणाऱ्या  शाळकरी विद्यार्थ्याना चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे. 

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील निशेत, ठाकूर पाडा येथील शाळकरी विद्यार्थी दररोज शाळेत जात असतात. गाव पाड्या पासून कळंबे येथील चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करतात. मात्र आगोदरच रस्त्याची दुरवस्था झालेली असताना पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र हे काम बांधकाम विभागाकडून करण्यात आले नाही. 

दुरुस्ती दाखवून लाखो रुपये लाटले 

दरम्यान ठेकेदाराच्या संगनमताने वाडा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दाखवून लाखो रुपये लाटले. यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. आता याचा त्रास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

विद्यार्थ्यांची रोज पायपीट 

दररोज शाळकरी विद्यार्थींना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास चार ते पाच किलोमीटरचा असून परतीचा प्रवास धरून आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास होत असल्याने शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थींनी शासनाला विनंती केली आहे कि हा रस्ता किमान दुरूस्ती करून तरी द्यावा. जेणे करून आम्हाला पायी प्रवास करावा लागणार नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Purnima Dey: 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम पूर्णिमा डेचा रेड हॉट अवतार; फोटो पाहून चाहते घायाळ

Ashok Kharat : अमावस्येच्या रात्री जोडप्याला बोलवलं अन्...; नाशिकमधील आणखी एका अशोक खरातचा पदार्फाश

पुढे 7 वाहन अन् मागे 7 वाहन; NEET पेपरसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त|VIDEO

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांनी केली शासनाच्या कर्जमाफी आदेशाची होळी......

Sanchita Ugale Video : प्रसिद्ध अभिनेत्रीची अकाली एक्झिट; आत्महत्येच्या काही तासाआधीची पोस्ट व्हायरल, आनंदी आयुष्यात अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT