Palghar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Accident: कामावरून घरी जाताना काळाचा घाला, पालघरमध्ये भरधाव कारने तरुणाला चिरडले

Palghar Car And Bike Accident: पालघरच्या मनोर मार्गावरील गणेश घाट येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. मध्यरात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. अपघातामध्ये बाईकस्वाराचा मृत्यू झाला.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये भीषण अपघाताची (Palghar Accident) घटना घडली आहे. भरधाव कारने बाईकस्वाराला चिरडले. या आपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कामावरून घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. मनोर रोडवरील गणेश घाट येथे अपघाताची ही घटना घडली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मनोर पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या मनोर मार्गावरील गणेश घाट येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. मध्यरात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात वाडा तालुक्यातील चांबले येथे राहणाऱ्या सागर पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सागर पाटील कामावरून घरी परतत असताना त्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. कार चालक घटनास्थळावरून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. पण स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला पण त्यानंतर तो पळून गेला.

दरम्यान पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून या चालकाला मनोरजवळील एका हॉटेलमधून अटक केली. आरोपी कार चालकाविरोधात हिट अँड रन प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत सागर पाटील यांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे . आरोपी सचिन सुरवसे याला मनोर पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती समोर येत आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT