Virar Ambedkar Jayanti Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Shocking Video: मिरवणुकीनंतर हसत खेळत घराकडे निघाले; पण वाटेतच मृत्यूने गाठलं, विरामधील 'त्या' घटनेचा VIDEO समोर

Ambedkar Jayanti News : आंबेडकर जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर घरी येत असताना ४ तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Virar Ambedkar Jayanti News: राज्यात आंबेडकर जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असताना गुरुवारी पालघरच्या विरार शहरात एक दुर्देवी घटना घडली. आंबेडकर जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर घरी येत असताना ४ तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

तर एक तरुण जखमी झाला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकीच भरली आहे. (Latest Marathi News)

घटना नेमकी कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या (Virar) कारगिल नगर परिसरात बौध्दजन पंचायत समितीतर्फे गुरुवारी (१३ एप्रिल) रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली.

कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉडचा रस्त्यावर असलेल्या रोहित्राला स्पर्श झाला. त्यामुळे रोहित्रामधील वीजप्रवाह संपूर्ण ट्रॉलीमध्ये पसरला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील सहा जण होरपळले. (Breaking Marathi News)

त्यातील रुपेश सुर्वे (वय ३० वर्ष) आणि सुमित सुत (वय २३ वर्ष) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. जखमींपैकी उमेश कनोजिया (वय १८ वर्ष) राहुल जगताप (वय १८ वर्ष), सत्यनारायण (वय २३ वर्ष) या तिघांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईच्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल उपचार सुरू होते.

मात्र, उपचार सुरू असताना या तिघांपैकी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अस्मित कांबळे (वय ३२ वर्ष) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (Viral Video) समोर आलं आहे. फुटेज पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या दुर्देवी घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी विरार पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; कवच प्रणाली व सिग्नलिंगसाठी १,३६४ कोटींची मंजुरी

Best Lipstick shades: नवीन लिपस्टिक खरेदी करणार आहात? या ७ लिपस्टिक शेड्स प्रत्येक स्किन टोन परफेक्ट दिसतात

Sathankulam Custodial Death Case Verdict: ९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा, हायकोर्टाचा फैसला; काय आहे प्रकरण?

KKR vs PBKS : अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय; जगातील नंबर १ खेळाडूसह दोन दिग्गजांना बाहेरचा रस्ता

Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

SCROLL FOR NEXT