Kudan Lake Thousands of dead fish found Saam Tv News
महाराष्ट्र

Palghar News : पालघरमध्ये मृत माशांचा खच, विषबाधेमुळे माशांच्या मृत्यची शक्यता

Palghar Dead Fish Carcasses Found : मासे मृत आढळले त्या परिसरात सांडपाणी नसताना तलावातील हजारो माशांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अस्पष्ट आहे.

Prashant Patil

पालघर : तारापूरजवळ असलेल्या कुडण या गावातील तलावातील हजारो मासे मृत झाल्याचं आज सकाळी आढळून आलं आहे. तारापूर जवळील कुडण ग्रामपंचायत हद्दीतील माळी स्टॉपजवळील तलावातील हजारो मासे मृत झाल्याचं रविवारी सकाळी आढळून आलं. सकाळी तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या एका स्थानिक पक्षी निरीक्षकाला तलावामध्ये मृत माशांचा खच पडल्याचे प्रथम आढळून आलं.

मासे मृत आढळले त्या परिसरात सांडपाणी नसताना तलावातील हजारो माशांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अस्पष्ट आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मासे आणि तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत.

सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून वाढत्या उष्णतेमुळे तलावाच्या पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा विषबाधेमुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तसेच महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत तलावाची पाहणी करून माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. मृत माशांना स्थानिक भाषेत खवल्या असं देखील बोललं जातं असून अशा माशांचा कुडण तलावाच्या किनाऱ्यावर खच पडल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT