Palghar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Crime: पालघर हादरले! घरी सोडतो सांगत जंगलात नेले, तरुणीसोबत भयंकर घडलं

Wada Crime News: पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

पालघरमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला घरी सोडतो असं सागून जंगलात नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने पालघर हादरले आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला आहे. या तरुणीला घरी सोडतो या बहाण्याने तिला दुचाकीवर बसवले आणि जंगलात नेले. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पीडित तरुणीला वडिलांसोबत घरी सोडतो असे आरोपीने सांगितले. वाडा येथून गावाच्या दिशेने जात असताना पीडित तरुणीच्या वडिलांना काही तरी काम आहे असे सांगून त्यांना मध्येच उरण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला जंगलामध्ये नेऊन दमदाटी करत तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेमुळे पालघर हादरले. पीडित तरुणीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT