Palghar Crime News
Palghar Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Palghar Crime News: बँक ऑफ बडोदावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, वॉकी टॉकीचा कसा करायचे वापर?

Sandeep Gawade

Palghar Crime News

मुंबईतील बँक ऑफ बडोदावर २०१७ मध्ये भुयारी मार्गे धाडसी दरोड्या टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. रात्रीच्या सुमारास संशयास्पद गाडीचे नंबर प्लेट बदलताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे तिघही सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं. यामध्ये मुख्य आरोपीवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे तब्बल 44 गुन्हे दाखल असून घरफोडी करताना या दरोडेखोरांकडून सशस्त्र दरोडा टाकला जायचा.

पालघर पोलिसांनी दरोडेखोरांची अधिक चौकशी केली असता या दरोडेखोरांनी पालघर मधील तारापूर परिसरात मागील काळात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे . अंजन आनंद महंती( वय 51 वर्ष राहणार विक्रोळी टागोर नगर ) , श्रावण कृष्णा हेगडे (वय 45 राहणार गोवंडी ) आणि सरोज अब्दुल सलाम अन्सारी ( वय वर्ष 26 चायना मार्केट गोवंडी ) अशी या तीन आरोपींची नाव असून त्यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात कलम 468 , 471 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून धारदार शस्त्र , वॉकी टॉकी तसच काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . याच गुन्हेगारांनी 2017 मध्ये नवी मुंबई येथील बँक ऑफ बडोदा बँकेत भुयारी मार्ग तयार करून साडेतीन कोटी रुपयांची घोरफोडी केली होती. सध्या पालघर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : रानडुकराची तस्करीच्या आरोपात तरुणाला कोंडून ठेवत मारहाण; तरुण गंभीर जखमी

Pune Crime: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, डॉक्टरने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; पाहा VIDEO

VIDEO: 'मनसे, वंचित ते ठाकरेंची शिवसेना', प्रकाश आंबेडकरांची साथ का सोडली? वसंत मोरेंनी सांगितलं पुन्हा तेच कारण!

Marathi Live News Updates : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 60% शेतकऱ्यांचे विमा दावे कंपनीने फेटाळले

VIDEO: शेकडो स्पीकर, आणि पोस्टर लावत, Hingoli मध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅलीची जय्यत तयारी

SCROLL FOR NEXT