Palghar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Palghar Crime : पहाटे रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडली; २० वर्षीय तरुणीसोबत घडली भयंकर घटना

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.

रुपेश पाटील

Palghar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

डहाणू तालुक्यातील कासा येथे शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक (Crime News) घटना घडली आहे. पूनम पिंटू भोमटे असं जखमी तरुणीचं नाव आहे. या हल्ल्यात पूनमच्या डोक्याला आणि हाताला जबर मार लागला आहे. कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथामिक उपचार करण्यात आल्यानंतर पूनमला पुढील उपचारासाठी सिलवासा येथे पाठवण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम ही पोलीस भरतीची पूर्व तयारी करीत होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे रनिंग करण्यासाठी बाहेर पडली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या घटनेत पूनम गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. कासा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT