धक्कादायक : दोरी उड्यांप्रमाणे हातात साप घेऊन तरुणाने मारल्या उड्या! पहा Video SaamTvNews
महाराष्ट्र

धक्कादायक : दोरी उड्यांप्रमाणे हातात साप घेऊन तरुणाने मारल्या उड्या! पहा Video

पालघरमध्ये एक तरुण चक्क दोरी उड्या मारतात त्या प्रमाणे हातात साप घेऊन उड्या मारतोय आणि काही तरुण त्याचा व्हिडीओ बनवत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर : काही तरुण जोशात येऊन कधी काय करतील याचा नेम नाही. आपण करत असलेल्या कृतीचा परिणाम काय होऊ शकतो याचा विचार न करता कोणतीही कृती केली जाते. असाच एक धक्कादायक व तितकाच संतापजनक प्रकार पालघरमध्ये (palghar) समोर आला असून एक तरुण चक्क दोरी उड्या मारतात त्या प्रमाणे हातात साप घेऊन उड्या मारतोय आणि काही तरुण त्याचा व्हिडीओ बनवत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पालघर मधील एका तरुणाचा सापासोबत (Snake) जीवघेणा खेळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सदर तरुण हा हातात धामण जातीचा साप पकडून त्या सापाला घेऊन दोरी उड्यांप्रमाणे उड्या मारत त्यासोबत खेळत असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. याबाबत सर्प मित्रांसह नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरुणाची बोलीभाषा ही पालघर मधील असून सदर तरुण पालघर मधील कुठला आहे याचा शोध सध्या सुरू आहे.

तरुणाकडून स्वतःच्या जीवाशी आणि सर्पाच्या जीवाशी खेळ सुरू असून त्याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आता वन्यजीव संरक्षकाकडून जोर धरू लागली आहे. एकीकडे वन्यजीव वाचावे यासाठी अनेक वन्यजीव संरक्षक संस्था विविध उपक्रम हाती घेत असताना अश्या प्रकारचे विकृत तरुण वन्य प्राण्यांच्या जीवाशी खेळून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रकार करत आहेत. याला कुठे तरी आळा बसावा व त्यांना काठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यात अश्या प्रकारे कोणी वन्य प्राण्यांना त्रास देणार नाही अशी मागणी वन्य प्रेमींनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT