Palghar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Accident: रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

Boy Died In Boisar After Falling Into Pit From Bike: बोईसर येथे दुचाकीवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.

Rohini Gudaghe

रूपेश पाटील साम टिव्ही, पालघर

पालघरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांने एका दीड वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यात दुचाकीवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. बोईसरमध्ये हा अपघात झालाय. बोईसर नवापूर रोडवरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.

बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन

या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण (Palghar Accident News) आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आहे. माहीर मोशीन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घटनेत मृत्यू झालाय. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोईसरमध्ये हा अपघात झालाय.

खड्ड्यांत दुचाकी आदळल्यामुळे अपघात

एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. हा चिमुकला त्याच्या आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात होता. हे कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत होतं. बोईसर नवापूर रोडवर असल्यामुळे खड्ड्यांत दुचाकी आदळल्यामुळे अपघात झाला. यामध्ये चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Palghar Accident News) झालाय.

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

या अपघातानंतर ग्रामस्थ (Boisar) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून राज्यात 'हिट अॅण्ड रन' घटनांचं प्रमाण देखील वाढलं आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या भरधाव वेगाने तर अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे अपघात होत असल्याचं समोर येतंय. पालघरमध्ये देखील रस्त्यांची दुरावस्था (Accident News) आहे. त्यामुळेच एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT