Pakode Becho Agitation अमर घटारे
महाराष्ट्र

Amravati: पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा; युवक कॉंग्रेसने पकोडे विकून केला निषेध

Pakode Becho Agitation In Amravati: बेरोजगारीला विरोध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क पकोडे (भजे) विकून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोध केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, अमरावती

अमरावती: आज, १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस (PM Modi Birthday) भाजपकडून जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवाच्या दिवशी विविध मुद्द्यांना हात घालत आंदोलन केले आहे. अमरावतीत (Amravati) कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. बेरोजगारीला विरोध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क पकोडे (भजे) विकून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोध केला आहे. (Amravati Latest News)

राज्यातील विविध मुद्द्यांवरुन अमरावती कॉंग्रेसने सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील शिंदे सरकार तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी टीका केली केले आहे. अमरावती येथील पंचवटी चौकात युवक काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.

यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना चक्क हातगाडीवर पकोडे विकून पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र आता तरुणांचा रोजगार हिरावल्याची भावना राज्यातील जनतेत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. यावेळी 'पन्नास खोके एकदम ओके', 'खोके सरकारच्या या कृतीचा निषेध' अशा आशयाचे बॅनर्स झळकवण्यात आले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT