भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाकीस्तानची अक्षरशा पाचावर धारण बसली आहे. मुख्य म्हणजे दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाक लष्कराची अक्षरशा पळापळ सुरु आहे. पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट.
भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाकिस्तानची अक्षरशा पाचावर धारण बसली आहे. पाकव्याप्त काश्मीर दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं लपून राहिलं नाही. आता इथल्या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताने प्लॅन बनवलाय. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पळापळ सुरु आहे.
कारण भारताकडून एलओसीवर पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी, सर्विलेंस आणि रडार सिस्टीम तैनात करण्यात आलीय. दहशतवाद्यांचे मुळं उखडून टाकण्यासाठी आणि सीमेपलीकडील कारवाईसाठी भारताने स्पेशल टीम तयार केलीय. दहशतवाद्यांची ठिकाणं नेमकी कुठं आहेत? पाहूयात.
रावलकोटमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प
मुजप्फराबादमध्ये 10 दहशतवादी कॅम्प, यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी सक्रीय
कोटलीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टेरर कॅम्प
उत्तरी पीर पंजालमध्ये 10 आतंकी कॅम्प, यात 50-60 दहशतवादी अॅक्टिव्ह
दक्षिणी पीर पंजालच्या 35 दहशतवादी कॅम्पमध्ये 70 दहशतवाद्यांना प्रशिक्षण
पाकिस्तानमध्ये 37 दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड आहेत. त्यापैकी 20 लॉन्चपॅड पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील मुजफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाक लष्करानं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला.
पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं शिबिर
जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबासह 15 संघटनांचे कमांडर सहभागी
मसूद अझहरने पहलगाम हल्ल्यासाठी दिली चिथावणी
पाकिस्तान आर्मीच्या एसएसजी टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण
प्रशिक्षण दिलेले 130 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रीय
आता केवळ दहशतवाद्यांचे कॅम्प उध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करुन चालणार नाही. कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे. त्यामुळे पाक लष्कराचा कणा मोडून शत्रू राष्ट्राचा माज उतरवण्याची खरी गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.