Pune Crime News Saam TV
महाराष्ट्र

Pune Crime News: पुण्यात चाललंय तरी काय? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेनं दहशत

Pro Pakistan Slogans: कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनये म्हणून कोंढवा परिसरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय.

Ruchika Jadhav

Pune: भारतात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो तर पाकिस्तानात १४ ऑगस्टरोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. यंदा भारतात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काही अक्षेपार्ह घटना घडल्यात. पुण्यामध्ये १४ ऑगस्टरोजी पाकिस्तान जिंदाबदच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेनंतर पुणे पोलीस अलर्ट झाले आहेत. कोंढवा परिसरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनये म्हणून कोंढवा परिसरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन सुरक्षारक्षकांना अटक केली आहे. अकबर नदाफ आणि तौकीर बिनतोडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यासह मुंबई, नाशिक आणि अहमदनगरमध्ये देखील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. अहमदनगरच्या भुईकोट किल्ला परिसरात पाच मुलांकडून "पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत तेरे तुकडे तुकडे...", अशा घोषणा देण्यात आल्यात.

तर कुलाब्यात देखील दोन महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलांकडून अक्षेपार्ह घोषणा देऊन इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवण्यात आली होती. या प्रकरणी दोन मुलांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google: गुगलचा मोठा निर्णय! 25 ऑगस्टपासून गुगलची ‘ही’ सेवा वापरता येणार नाही

Amravati Crime : वाळू तस्करीला विरोध; युवकावर प्राणघातक हल्ला, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: लोकसभेत गदारोळ, कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब

HBD Dhanush : साऊथचा किंग धनुष किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून डोळे भिरभिरतील

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT