Vitthal Rukmini Pandharpur, Shri Vitthal Rukimini Mandir Samiti, Pandharpur News saam tv
महाराष्ट्र

Shri Vitthal Rukimini Mandir : भाविकांनाे ! पंढरीच्या विठुरायाची पाद्यपूजा, तुळशी पूजा बंद; जाणून घ्या कारण

padya pooja of vitthal rukmini : वर्षभर भाविक पंढरीला येत असतात.

भारत नागणे

Pandharpur News : देश-विदेशातून लाखाे भाविक पंढरपूरला येत असतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलेल्या नव्या निर्णयाने पंढरपूरातील (pandharpur) विठ्ठल रखुमाई मंदिरातील विठ्ठल आणि रखुमाईचे (vitthal rukmini) दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांची अधिक महिन्यात (adhik mahina) मात्र निराशा हाेणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. (Maharashtra News)

आषाढी एकादशी नंतर देखील पंढरपूरात हजाराेंच्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांची काेणत्याही प्रकारची अडचण हाेऊ नये यासाठी मंदिर प्रशासन काळजी घेत असते. याबराेबरच पंढरपूरात अधिक महिन्यात (adhik mass 2023) देखील भाविकांची विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी माेठी गर्दी हाेत असते.

याच अनुषंगाने (pandharpur) मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड म्हणाले अधिक महिन्यात विठ्ठलाची पाद्य पूजा सुमारे महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. याबराेबरच तुळशी पूजा ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या 18 जुलै पासून अधिक महिन्यास प्रारंभ हाेत आहे. त्यानूसार येत्या 17 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत विठूरायाची पाद्य पूजा बंद राहील. अधिक महिन्यात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून मंदिर समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती (pandhari) मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

Panhala Fort : कोल्हापूरजवळील ऐतिहासिक रत्न! पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT